भारत हा जगात पवित्र देश आहे म्हणुनच भारताला विश्वाचे तिर्थक्षेत्र म्हटले आहे. याच भारत भुमित महाराष्ट्र हे महान राष्ट्र आहे. देव-देवतांची, ऋषी-मुनी, तपस्वी योगी, साधुसंत, महंताची भुमी आहे. या महाराष्ट्रात आपला सातारा जिल्हा आहे !
पौराणिक, धार्मिक, ऐतिहासिक व संताची महान परंपरा साताऱ्याला लाभली आहे. शुर-वीरांची, देशभक्तांची, ज्ञानी, विचारवंतांची, कर्मयोग्यांची, कलाकारांची व थोर पुरषांची खाण म्हणजे सातारा! निसर्गाने नटलेला! धन-धान्यांनी बहरलेला! प्रेमाने, सहकार्याने, बंधुभावाने अंत:करण भरलेला सातारा!

पूर्वजांचा वारसा चालविणारा सातारा!

अशी ही साताऱ्याची परंपरा
परंतु आम्ही नोकरी / व्यावसायासाठी गांव सोडून मुंबईला आलो. अंतरराष्ट्रीय ख्यातीच्या या शहरात नशीब अजमावीत असताना असंख्य समस्यांशी सामना करावा लागत आहे. यापूर्वीच काळ थोडा बरा होता. परंतु  या पुढे या शहरात सुखाने जीवन  जगणे कठीण होत चालले आहे. सर्वत्र अस्थिर  व अशांततेचे वातावरण पसरलेले आहे. मुलांच्या शिक्षणाची समस्या गंभीर झालेली आहे.  त्यांच्या शाळा प्रवेशापासूनचा असहय त्रास पालकांना सहन करावा लागत आहे. शैक्षणिक खर्च आवाक्याबाहेर गेला आहे. शिक्षण पूर्ण झाले तरी नोकरीचा प्रश्न त्याहूनही कठीण झाला आहे.
उद्योग-व्यापार करावयचा तर आर्थिक पाठबळ नाही, त्यातील अनुभव नाही. घराची समस्या बिकट झाली आहे. नवे घर अथवा घर दुरुस्ती न परवडणारी आहे.

छोट्या मोठ्या उद्योग व्यावसायातील मंडळीना खूप त्रास सहन करावा लागत आहे

छोट्या मोठ्या उद्योग व्यावसायातील मंडळीना खूप त्रास सहन करावा लागत आहे. नोकरदारांच्या नोकऱ्या शाश्वत राहील्या नाहीत. नोकरीच्या ठिकाणी अन्याय सहन करावा लागत आहे. घर बाहेरील वातावरण धोकादायक झालेले आहे. तरुण मुला-मुलींची काळजी वाटत आहे. भांडणे, दंगे, वादावादी-मारामाऱ्या उघड्या डोळ्यांनी रोज पाहत सहन करावे लागत आहे. मुंबईचे दैनंदिन जीवन अत्यंत धक्काबुक्कीचे व असह्य झाले आहें. मुला-मुलींच्या लग्नाची समस्या गंभीर झाले आहे. रोग-आजाराचे खर्च वाढतच आहे. मोठ्या शस्त्रक्रिया व त्यावरील औषधोपचार परवडणारा नाही. कुटुंबाची   आवकच थंडावली आहे.

आपल्या पतसंस्था, बँका, मंडळे, संघटना, उद्योग व्यावसाय अडचणीत आहेत

दुसरीकडे आपल्या पतसंस्था, बँका, मंडळे, संघटना, उद्योग व्यावसाय अडचणीत आहेत. ना त्यांना राजाश्रय, ना कोणाचा आधार. त्यामुळे एक एक संस्था, उद्योग व्यावसाय कमी होत चालला आहे. या सर्व गंभीर समस्या व दैनंदिन जीवनातील इतर अनेक अडीअडचणी सोडवण्यासाठी आपण सर्वांना सातारकर म्हणून एकत्र आले पाहिजे, त्याला पर्याय नाही.
धर्म, जात, पंथ, पक्ष इत्यादी सर्व भेदभाव बाजूला ठेवून केवळ “आम्ही सातारकर” म्हणून सर्वांनी एकत्र आले पाहिजे. मुंबई, ठाणे व नवी मुंबई परिसरात असंख्य सातारकर एकत्र राहत आहेत. अनेक थोर व्यक्ती अहेत. अंत:करणापासून सहकार्य करणाऱ्यांची मांदियाळी आहे. म्हणून आपल्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. साताऱ्याची महान परंपरा आपणास पुढे चालवायची आहे. आपल्या सहभागाची, सहकार्याची, मार्गदर्शनाची व आशीर्वादाची गरज आहे.
तरी ‘आम्ही सातारकर’ विकास प्रतिष्ठान तन, मन व धनाने सहभागी व्हावे हि विनंती,